भाजप राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी साधला निशाणा

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध पेटलेले दिसून येत आहेअशातच आता ईडीच्या कारवाईनंतर कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजप राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाला आहे असे खोचक ट्विट केले आहे.

सचिन सावंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांवरील ED ची कारवाई भाजपा राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाला आहे हे पुन्हा दर्शवते. पूर्वी डॉन जागा बळकावण्यासाठी गुंड पाठवायचे. मोदी सरकार सत्ता बळकावण्यासाठी तपास यंत्रणा पाठवते. २०१४ ते २२ मध्ये ED ने २९७४ धाडी उगीच टाकल्या नाहीत. यात एकही भाजपाचा नाही.

 

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, खरे तर भाजप अध्यक्षांची आधी चौकशी झाली पाहिजे. वाधवानकडून ₹२० कोटी देणगी कशी मिळाली? हा काळा पैसा नाही? आधुनिक दुर्योधन व दुःशासन लोकशाहीचे वस्त्रहरण करताना संविधानिक संस्था भीष्माचार्य व द्रोणाचार्याप्रमाणे साथ देत आहेत. धृतराष्ट्राप्रमाणे कायदेव्यवस्था वागते हे देशाचे दुर्दैव अशी टीका ट्विट करून केली आहे.

Team Global News Marathi: