सर्व पक्षांना आत्मपरीक्षणाची गरज, नेहरु आणि वाजपेयी देशाच्या लोकशाहीचे आदर्श – नितीन गडकरी

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपली कार्यक्षमता आणि स्पष्टवक्तेपणामुळे अधिक ओळखले जातात. अनेकवेळा त्यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी पक्षविरोधात भूमिका घेताना सुद्धा दिसून आले आहेत. गडकरी देशातील परिस्थिती, राजकारण आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशन अशा अनेकविध मुद्द्यावर एका कार्यक्रमात बोलताना रोखठोक मते मांडली.

देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू आणि दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे दोन्ही नेते भारताच्या लोकशाहीचे आदर्श आहेत. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान होते, असे गडकरी यांनी नमूद केले.सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि पेगॅसस स्पायवेअरवरुन दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी या मुद्द्यांवर सरकारकडे चर्चेची मागणी केली होती. त्यामुळे वारंवार सहागृह तहकूब करावे लागले होते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर, आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे. त्यामुळे आमच्या भूमिका बदलत राहतात असा गडकरी यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: