गिरीश महाजन बालिश; एकनाथ खडसेंनी साधला निशाना

 

गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक खडाजंगी आपल्या सर्वांच्या परिचयाचीच. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला होता. खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले अन् प्रसाद संपला तर बाहेर आले अन् चप्पल चोरीला गेली अशी झालीय, असा निशाणा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर साधला आहे.

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत खडसेंना विचारल्यावर त्यांनी गिरीश महाजन बालिश आहेत, असं म्हणत टोला लगावला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्याच्या शब्दहीक चकमकीनंतर जळगावातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी सपत्नीक पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यावेळी गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “गिरीश महाजनांना मीच राजकारणात आणलं. पहिल्यांदा त्यांना मीच आमदार म्हणून निवडून आणलं. ते बालिश आहेत.” एकनाथ खडसे पंढरपुरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी माध्यमांशी बातचीत करताना त्यांनी ही टीका केली आहे.

Team Global News Marathi: