अंधेरी पोटनिवडणुकीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. ‘निवडणुका घरात बसून किंवा ऑनलाईन होत नाही. होईल तर समोरासमोर पण होईल, असं म्हणत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांची व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये जोरदार पाठराखण केली.
‘गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता, त्यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक वेळी आपण मुडमध्ये राहू असे नसते ना., लोकप्रतिनिधी हा सुद्धा एक माणूस असतो, महाजनांनी सांगितल की, फाईल रद्द केली असेल, तर समोरच्या ऐकणाऱ्याला गिरीश महाजन जोरात बोलले असे वाटले असेल, गिरीश भाऊंना विनंती करू की, यापुढे शांत बोला, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी बोलतांना सांगितले.
तसेच हे खडसेंनी चॅलेंज देवून सांगावं – पाटील सट्टा-पत्ता अवैधधंद्ये याबरोबरच विविध विषयायांवर एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना जोरदार उत्तर दिले आहे. ‘कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात अवैध धंदे असतील हे मी मान्य करतो, मात्र खडसे सुद्धा पालकमंत्री होते, त्यावेळी अवैधधंदे नव्हते, हे नव्हते, हे खडसेंनी चॅलेंज देवून सांगावं, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी खडसेंना दिले आहे.