घरासमोर खेळणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने मारली झडप

 

नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याने एका आठ वर्षांच्या मुलीवर हल्ला केला आणि जंगलात नेऊन तिला ठार मारलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या धुमोडी गावात ही घटना घडली. सोमवारी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास बिबट्याने एका ८ वर्षांच्या मुलीवर हल्ला केला.

रुची एकनाथ वाघ असं या मुलीचे नाव आहे. बिबट्याने जबड्यात धरून या मुलीला जंगलात नेले. सुमारे साडे चार तास वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी रात्री शोधकार्य केलं. अखेरीस अकरा वाजेच्या सुमारास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात बलिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला.

तालुक्यातील धुमाडा गावच्या शिवारात असलेल्या वाघ कुटुंबीय वास्तव्यास आहे. घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने रुची एकनाथ वाघ हिच्यावर झडप घातली. त्यानंतर काही कळायच्या आता बिबट्याने जबड्यात धरून रुचीला वेगात जंगलात घेऊन गेला. बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे धाव घेतली. गावकऱ्यांनी याची माहिती तातडीने वन कर्मचाऱ्यांना दिली. काही वेळातच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी सुमारे चार ते साडे चार तास शोध घेतला. यानंतर झाडांच्या मध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला. अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत या मुलीचा मृतदेह हाती लागला. बिबट्याने या चिमुरडीचा गळा आणि एक हात खाल्ला होता. मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहॆ.

Team Global News Marathi: