गुवाहाटीचं कौतुक केलं, त्यात वाईट वाटायचं काय? शहाजी बापूंचा पक्षप्रमुखांना सवाल

 

मुंबई | काय झाडी, काय डोंगार… असा डायलॉग म्हणून लोकप्रिय झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्रातील व्यक्तीनं गुवाहाटीचे कौतुक केलं तर त्यात वाईट वाटायचं काय? असा सवालच बापू पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महा मुलाखतीतून सांगोल्याचे शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गुवाहाटीच्या कौतुकावरुन टीका केली होती. आता शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक पाहता या राज्यातील जे ज्येष्ठ नेते आहे, त्यापैकी उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशी वक्तव्य करु नये, असा सल्लाच शहाजीबापू पाटलांनी दिला आहे.

फक्त उद्धव ठाकरे यांच्या तोडातून ती बोलवून घेतली जात आहे. वास्तविकता चाललेल्या राजकारणामध्ये जो काही संघर्ष सुरू आहे. आज त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी उदात्त मनाने एक पाऊल मागे घ्यायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा महान विचार करावा, अशी विनंतीही शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केली.

तसंच, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या पक्षाला विरोध केला त्या पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून ते बसले. पण आता हिंदूत्वासाठी भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवली होती, त्यामुळे एकत्र येत असताना त्यांचाही विश्वास तोडता कामा नये, असा सल्लाही पाटील यांनी दिला.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी निष्ठा यात्रेतून कोल्हापुरात शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Team Global News Marathi: