गेट वेल सून मामू, मनसेने लगावला जोरदार टोला

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ‘मुन्नाभाई’ असा उल्लेख करत खोचक शब्दांत टोला लगावला होता. यावर आता मनसेने उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना थेट ‘मामू’ अर्थात या चित्रपटातील बोमन इराणी यांच्या पात्राची उपमा दिली आहेउद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. ते सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे.

”आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईच काळीज कळायला ‘मामू’ला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू,” असे गजानन काळे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या सभेत राज ठाकरेंवर पुन्हा ‘मुन्नाभाई’ म्हणत निशाणा साधला होता. “काहीही करून उद्धव ठाकरेंना संपविण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे चेलेचपाटे मुंबई जिंकण्यासाठी काहीच दिवसात मैदानात उतरतील आणि त्याला आपल्या मुन्नाभाईची साथ असेल, पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. अशा इशारा दिला.

Team Global News Marathi: