राज्याला अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, राष्ट्रवादीच्या आमदाराने लगावला भाजपाला टोला

 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भारीत्या जनता पक्षाला जोरदार टोला लगावला आहे. या संदर्भात ट्विट करून रोहित पवार यांनी यांनी भाजपाला टोला लगावला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात सीबीआयनं क्लीनचिट देण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे.

त्या प्रकारची कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपवर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं !यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो!, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

या ट्विटसोबत रोहित पवार यांनी पूर्वीचं आणखी एक पोस्ट करुन हे नवं ट्विट केलं आहे. पूर्वीच्या ट्विटमध्ये त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर राजीनामा दिला होता, याचा उल्लेख करण्यात आला होता. अनिल देशमुखांना क्लिनचिट? १०० कोटी वसुली प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं होतं.

सदर प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. दरम्यान आता याच संदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरून आता सत्तेत असलेल्या आघाडी सरकारने विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला होता.

Team Global News Marathi: