“गर्जेल तो पडेल काय? उगाच टीमक्या,डायलॉगबाजी अन्.” भातखळकरांचा तोल

 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसून येत आहे. संजय राऊत यांनी जम्बो कोविड सेंटर मध्ये १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे, तर किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी निकॉन कंपनीच्या मार्फत कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उडी घेत टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “गर्जेल तो पडेल काय? नील सोमैय्या यांच्या विरुद्ध संजय राऊत यांनी बोटभर तक्रारही केलेली नाही असे प्रतिज्ञापत्र EOW ने न्यायालयात सादर केले आहे. कुठे आहेत २५ हजार कोटींची भ्रष्टाचाराचे पुरावे? ED च्या विरोधातील साक्षीदार? उगाच पत्रकारांसमोर टीमक्या,डायलॉगबाजी आणि तोंडाच्या वाफा”, असा सवाल करत खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

शिवसेना खासदार यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेची पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. “महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाला. हा घोटाळा तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा होता. फडणवीसांच्या काळात खूप घोटाळे झाले, पण त्यातला सर्वात मोठा घोटाळा महाआयटीत झाला. या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? त्यांना कुठं लपवलंय ते त्यांनी सांगाव असे सवाल उपस्थित केले होते.

Team Global News Marathi: