गणेशोत्सवातील लेझर शो ठरला घातक, कोल्हापुरात ६३ जणांच्या डोळ्याला इजा

 

करोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. मात्र, यंदा कुठलेही नियम आणि निर्बंधांशिवाय यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. तसे कोल्हापुरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून डॉल्बीवर बंदी होती. मात्र, यंदा निर्बंध हटवल्याने सर्वत्र डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळाला. मात्र, याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.


या वेळेसच्या विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीसोबत असलेला लेझर शो कोल्हापूरकरांना घातक ठरला आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत लेझर शोमुळे ६३ जणांच्या डोळ्याला इजा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर डोळ्याला इजा होणाऱ्या रुग्णांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता कोल्हापूर जिल्हा नेत्र संघटनेने वर्तवली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर शो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. तब्बल ३ ते ४ वर्षांनी कोल्हापुरात डॉल्बीचा दणदणाट पाहायला मिळाला होता. तर, डॉल्बीसोबत यंदा लेझर किरणही मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले होते. मात्र, आता हाच लेझर चिंतेचा विषय ठरला असून कोल्हापुरातील तब्बल ६३ जणांच्या डोळ्याला इजा झाली आहे. सोबतच मोबाईलवर ही परिणाम झाले असून अनेक मोबाईलचे कॅमेरे बाद झाले आहेत.

Team Global News Marathi: