गणेश नाईक यांच्यावर आरोप करणारी महिला राष्ट्रवादीत जाणार ?

 

नवी मुंबई | भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या दिपा चौहान यांनी आता नवी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्षांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळावी, अशी विनंती दिपा चौहान यांनी केली आहे. यामुळे आता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतो का हे पाहणं औत्सुकतेचं असणार आहे.

१९९३ साली तक्रारदार महिला वाशी सेक्टर-१७ मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी गणेश नाईक क्लबमध्ये बैठकीसाठी जात असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करीत होते. १९९५ पासून आमच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यावेळी नाईक मला पारसिक हिल येथील बंगल्यावर घेऊन गेले. आणि त्यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. पुण्यातही आमच्यामध्ये संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. असे दीपा चौहान यांनी म्हंटले आहे.

त्यानंतर नोव्हेंबर २००६ मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर न्यू जर्सी येथे १८ ऑगस्ट २००७ मध्ये या महिलेने मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी नेरूळमधील सीब्रीज टॉवर इमारतीत या महिलेला राहण्यास नेले. ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केले, अशी तक्रार दिपा चौहान यांनी केली आहे. दरम्यान या आरोपामुळे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

Team Global News Marathi: