कल्याण तालुक्यात खरी पक्षाची वाट गणेश नाईक यांनी लावली – जितेंद्र आव्हाड

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शरद पवारांचे विश्वासू गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता0 पावसात प्रवेश केला होता. मात्र दुसरीकडे सेनेने भाजपाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून सरकार स्थापन केले होते. त्यातच आता गणेश नाईक यांचे कट्टर शत्रू मंत्री डॉ जितेद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यांवर निशाणा साधला होता.

कल्याण तालुक्यात खरी पक्षाची वाट गणेश नाईक यांनी लावली. त्यांनी रणनीती आखत पक्ष पोखरला. त्यानंतर जी गळती झाली त्यातून आपण अजून सावरलो नाही. यापूर्वी सुद्धा आव्हाड आणि नाईक यांच्यात खटके उडताना दिसून आले होते. मात्र आता थेट नाईक यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला होता.

तसेच मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना आव्हाड म्हणाले की, कोविड संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती कोणालाच जमली नसती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे नाही, अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कामाचे कौतुक केले.

शिवसेनेच्या शाखांमधून ज्या पद्धतीने गोरगरीबांची कामे केली जातात तशाच प्रकारचे काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही करावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले. डोंबिवली पूर्वेत रविवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीचा संदर्भ देत काम कसे करायचे हे सांगितले.

Team Global News Marathi: