गडकरीजी, देशात प्रचंड मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लतादीदींचं नाव द्या

 

भारतरत्न लता मंगेशकर यांचे काही दिवसांपूर्वी रुग्णालयात निधन झाले होते मात्र आजही त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे चाहते आणि सर्व स्थरातील मान्यवर दिसून येत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि लतादीदी यांच्यातील नाते सर्व महाराष्ट्राला परिचित होते अशातच आता याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मोठी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

“जगाच्या पाठीवर तुम्हाला अशी इमारत कुठेही सापडणार नाही, ज्याच्या एका मजल्यावर लता दीदी राहायच्या, जिथे आशाताई राहायच्या, पंडित हृदयनाथ मंगेशकर राहतात, उषाताई राहतात, मीनाताई येऊनजाऊन असतात, अशा एका मजल्यावर या देशातल्या चित्रपटसृष्टीतील-संगीत क्षेत्रातील २०-२२ हजार गाणी आहेत.अशा प्रकारची वास्तू जगाच्या पाठीवर कुठे असेल असं मला वाटत नाही. येता जाता मी त्या इमारतीला नमस्कार करतो,” असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मराठी वृत्तवाहिनीतर्फे ‘अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठा प्रोजेक्ट करा आणि त्याला लता दीदींचं नाव द्या अशी विनंती केली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Team Global News Marathi: