इंधन दरवाढ : मोदींच्या बहिरेपणावर इलाज करणे अत्यंत जिकरीचे

देशात मागच्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ विरोधात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्यात विविध राज्यांमध्ये विरोधकांकडून जागोजागी आंदोलने करून इंधन दरवाढ विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे. याविरोधात आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीकडून सायकल चालवून इंधन दरवाढ विरोधात निर्दर्शने देण्यात आली.

यावर बोलताना काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. २०१४ पूर्वी भाजप नेते इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते. परंतु, तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे असे थोरात यांनी बोलून दाखविले होते.

तसेच केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, असा आरोप काँग्रेसकडून यावेळी करण्यात आला.

Team Global News Marathi: