शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस 

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली.  यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील रुग्णालयात उपस्थित होत्या.

शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अजून याबाबत जे. जे. रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.  दरम्यान, देशात आजपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी कोणालाही कळण्यापूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात  जाऊन भारत बायोटेकची  ‘कोव्हॅक्सिन’ लस टोचण्यात आली. तसेच देशाचे उप राष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी चेन्नई येथील रुग्णालयात लस घेतली आहे.तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही पाटणा येथे लस टोचून घेतली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: