आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, संभाजी छत्रपतींनी चळवळीचं नेतृत्व करावं

 

कोल्हापूर | राज्यात आरक्षणाचा मुद्धा तापत असताना आता खासदार संभाजी छत्रपती मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा राज्यभर दौरे करणार आहेत. संभाजीराजेंच्या या निर्णयाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे. आघाडी सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही हे संभाजीराजेंनी लक्षात घ्यावं, असं सांगतानाच संभाजीराजेंनी या चळवळीचं नेतृत्व करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. संभाजी छत्रपती यांनी घेतलेल्याल निर्णयाचं स्वागत करेन. अभिनंदन करण्याइतका मी मोठा नाही. संभाजीराजेंकडून फार मोठी अपेक्षा आहे. या चळवळीला कुणी तरी नेतृत्व देण्याची गरज आहे. ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं तेव्हा सर्व संघटना रणांगणात उतरल्या होत्या. भाजपही उतरली होती.

ते म्हणाले की, मराठा आंदोलनात भाजप उतरली. पण भाजप राजकीय पक्ष असल्याने त्याला राजकीय रंग दिला गेला. मात्र, संभाजी राजे हे पक्षांच्यावर आहेत. त्यांनी नेतृत्व केलं तर या चळवळीला बळ येईल. हे सरकार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. संभाजी राजेंनी हे लक्षात घ्यावं. सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. ते त्यांनी करावं, असं पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: