महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकाला मारहाण, फीसाठी चर्चेला आल्यानंतर घडला प्रकार

 

पुणे | पुण्यात महिला बाऊन्सरकडून शाळेत पालकांना मारहाण केल्याचा प्रकार घडलं असून पालकाला मोठा जबर मर लागला आहे. फी संदर्भात विचारणा केली असता पालकांना मारहाण करण्यात आली आहे. पुणे येथील क्लाईन मेमोरियल शाळेत ही घटना घडली. पालक मंगेश गायकवाड यांच्याकडून या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आलेल्या पत्राबाबत म्हणणं मांडण्यासाठी सगळे पालक शाळेत गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांना भेटण्याची मागणी करणाऱ्या पालकांना महिला बाऊन्सरनं मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घडलेल्या संदर्भात पालकानं या प्रकरणी तक्रार दिली असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा संबंधित शाळेत शिक्षण घेतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाची फी भरण्यासाठ त्यांना पत्र दिलं होतं. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणं दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचं मंगेश गायकवाड यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Team Global News Marathi: