विधानसभा अध्यक्षपदावरून सरकार घाबरल्याचे पाहून आनंद – देवेंद्र फडणवीस

नाना पाटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता तसेच काँग्रेस नेतृत्वाने यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती. त्यामुळे पुन्हा तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या आघाडी सरकारपुढे नवा विधानसभा अध्यक्षपद कोणाला निआवडावे याबाबत दुमत असल्याचे पाहायला मिळत आहे यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध होतं, निवडणूक होत नाही, पण हे सरकार असे आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचे हनन करते, त्याबाबत आम्ही मित्रपक्षांसोबत बसू आणि निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद होतोय असे फडणवीसांनी बोलून दाखविले होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रासाठी मान्य झालेल्या आणि अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या प्रकल्पांचे एकूण मूल्य ३ लाख ५ हजार ६११ कोटी इतकी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Team Global News Marathi: