शिवसेनेचा ‘वाघ’ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला, रामदास आठवले यांची टीका

नांदेड : राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले होते. मात्र या तीन पक्षाच्या सरकारवर विरोधकांनी अनेकवेळा बेछुड आरोप लगावले होते. त्या पाठोपाठ आता रिपाई नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात मवाळ झाले आहेत. त्यांना आता मवाळ झाल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. असा टोला आठवले यांनी लगावला आहे. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

तसेच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत फार दिवस टिकणार नाही, म्हणून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत यावे असे देखील यावेळी आठवले यांनी बोलून दाखविले होते. राज्य सरकार तीन पक्षाचे आहे, सध्या दोन पक्षातील प्रकरण बाहेर आली आहेत. तिसऱ्या पक्षातील प्रकरण देखील लवकरच बाहेर येईल. असा दावा मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केला आहे.

Team Global News Marathi: