पोलिसांना आयाबहिणींवरून शिव्या देणाऱ्या वरूण सरदेसाईला अटक का नाही केली? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?

 

केंदीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सामना अग्रलेखातून शिवसेना नेते आणि कसदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपल्या हुजुरेगिरीमुळे बावचळेले संजय राऊत भोकं पडलेल्या फुग्याला का घाबरतायत? असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय?,” असा सवालही पडळकर यांनी ट्विट करून केला आहे.

“असं तर नाही ना की नारायण राणे यांचा फुगा तुमच्या विषयीच्या गुपितानं भरलाय? जो फुटला तर तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. नारायण राणे यांच्यावरील सूडाची कारवाई ही कायद्याची कारवाई असं तुम्ही संबोधता. पण पोलिसांना आयाबहिणींवरून शिव्या देणाऱ्या वरूण देसाई यांना अटक का नाही केली? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?,” असा सवालही पडळकरांनी केला.

“ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचं मार्मिक शब्दांनी पितळ उघडं केलं, पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करताय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय. हिंदू समाजाला सडलेला समाज म्हणणारा सर्जिल उस्मान उजळ माथ्यानं माहाराष्ट्रात फिरतो. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. सत्तेच्या लालसेपोटी त्याच्यावर कारवाई करताना तुमचे हात थरथर कापतायत,” असा आरोपही त्यांनी केला.

 

Team Global News Marathi: