आरोग्य राज्यमंत्र्याकडून कोविड नियम पायदळी, विजय उत्सवाला मोठ्या प्रमाणात जमली गर्दी

 

कोल्हापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या नियर्मांचे काटेकोर पालन करण्याचे आव्हान करत असताना दुसरीकडे मात्र आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकरकडूनच नियम पायदळी तुडविल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नियम फक्त सामान्य नागरिकांचा असतात का ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. यावेळी विना मास्क शेकडो कार्यकर्त्यांसोबत जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करताना ते दिसले. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. जिल्ह्यात अनेक नेत्यांकडून अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन झाले आहे. याच मुद्द्यावरून आता टीका होताना दिसून येत आहे.

तर दुसरीकडे अनेक नेत्यांकडून जिल्हा बँक निवडणुकीनंतर विजयी मिरवणूक काढण्यात आल्याचे चित्र दिसून आले होते. नेत्यांच्या कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत अनेक पोस्ट व्हॉट्सअॅपवर सुद्धा पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक नेत्यांकडून अशा पद्धतीने जिल्हा बँक निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष झाला. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिक मात्र चांगलेच संतापले आहेत.

Team Global News Marathi: