राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन ने पार केले द्विशतक

राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन ने पार केले द्विशतक

मुंबई : मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत हलकी घट झाली असली तर राज्यातील रुग्णसंख्या मात्र 45 हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा कहर सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजदार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्क्यांवर पोहोचलाय.

तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: