‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची नवाब मालिकांविरोधात पोलिसात धाव

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून अनेक गंभीर आरोप लगावत आहे. त्यातच मलिक यांनी काही दिवसांपूर्वी वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचे चाट ट्विट वरून प्रसिद्ध करत टीका केली होती. आता मलिक यांनी जगजाहीर केलेल्या रेडकर यांच्या चॅटवरून त्यांच्या अडचणी वाढताना दिसून येणार आहे.

नवाब मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले होते. कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या एका व्यक्तीनं नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या संबंधीत पुरावे असल्याचं क्रांती रेडकरला सांगितलं होतं. तर हे पुरावे दिले तर बदल्यात तुला बक्षीस दिलं जाईल, असा मेसेजही क्रांतीनं केला असल्याचं या चॅटमध्ये दिसत आहे. पुढे कॅप्टन जॅक स्पॅरो नावाच्या व्यक्तीनं नवाब मलिक आणि राज बब्बर यांचा फोटो पाठवला. राज बब्बरची बायकोही त्यांना लाडाने दाऊद म्हणते असं त्यानं म्हटलं.

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या या स्क्रिनशाॅटवरुन आता क्रांती रेडकर यांनी मुंबई पोलिसात ऑनलाईन तक्रार केली आहे. यामध्ये क्रांती रेडकरनं म्हटलं की, नवाब मलिकांनी शेअर केलेल्या चॅटची पडताळणी न करता चुकीचे ट्विट केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी क्रांती रेडकरनं केली आहे. दरम्यान, माय गॉड! सकाळी सकाळी काय जोक मिळाला, आनंद घ्या. सर्वांचा दिवस चांगला जावो, असं कॅप्शन देत नवाब मलिक यांनी हे स्क्रीनशाॅट शेअर केले आहेत. यामुळे आता वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं पहायला मिळत आाहे.

 

Team Global News Marathi: