देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय मोठी घट

नवी दिल्ली | देशातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या गेल्या काही महिन्यात हळूहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठ्या घट होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासातील देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारीही दिलासा देणारी आहे.

मागच्या २४ तासात देशभरात ९ हजार २८३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १० हजार ९४९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच देशातील कोरोनामुक्तीचा दर हा ९८.३० टक्क्यांवर आला आहे.

दरम्यान, सध्या देशभरात १ लाख ११ हजार ४८१ सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या २४ तासात ४३७ कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत ०४ लाख ६६ हजार ५८४ कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने १०० कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: