‘कंगनाकडून पद्मश्री परत घ्या’ विरोधकांसह भाजपा नेत्यांनी केली मागणी |

 

मुंबई | अभिनेत्री कंगना रानौत सतत आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहते. त्यातच तिने भारताच्या स्वातंत्र्याबाबत असं काही वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे देशभरातून तिच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षाबरोबर भाजपचे नेतेही तिच्यावर टीका करीत आहेत. अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली की, भारताला ‘1947 मध्ये स्वातंत्र्य नाही तर केवळ भीक मिळाली होती. आणि स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळालं, जेव्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आलं असं विधान तिने केलं होत.

स्वातंत्र्य भीक म्हणून दिल्याच्या वक्तव्यानंतर चहूबाजूंनी तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस आणि शिवसेनेेने तिच्या वक्तव्यावर राग व्यक्त केला आहे. काँग्रेस यावर म्हणाली की, तिचं वक्तव्य देशद्रोही आहे आणि यासाठी तिच्याकडून पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. हे ही बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत लवकरच करणार लग्न, फॅमिली प्लॅनिंगवर केला खुलासा काँग्रेस प्रवक्ता गौरभ वल्लभ म्हणाले की, कंगना रणौतने सर्व नागरिकांनी माफी मागायला हवी, कारण हा स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा आणि क्रांतिकारकांचा अपमान आहे.

पुढे ते म्हणाले की, भारत सरकारने अशा महिलेकडून पद्मश्री परत घ्यायला हवा, जिने महात्मा गांधी, सरदार पटेल, सुभाष चंद्र बोस, पंडित नेहरू, सरदार भगत सिंग यांचा अपमान केला. अशांना पद्मश्री देणे म्हणजे सरकार अशांच्या पाठीशी असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रीती मेनन यांनी कंगना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रीती मेनन यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी मुंबई पोलिसांना एक अर्ज दिला असून ज्यात कंगना रणौतवर तिच्या देशद्रोही आणि चिथावणीखोर वक्तव्यांसाठी कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Team Global News Marathi: