मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी, रिलायन्स रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया !

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज सकाळी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाली. वरिष्ठ आँर्थो सर्जन डाँक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ०८.४५ वाजता डाँक्टरांची टीम आँपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी आँपरेशन यशश्वी झाल्याचं सांगितलं. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आँपरेशन थिएटर मध्येच आहेत. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली होती. मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं. सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आणि ते रुग्णालयात दाखल झाले. हाँस्पिटलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित आहेत. गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठ आणि मान दुखीचा त्रास होत होता. त्यामुळे वरिष्ठ डाँक्टरांच्या सल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही लहान शस्त्रक्रिया करण्यात आली अशी माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने दिली आहे.

Team Global News Marathi: