इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल – रुपाली चाकणकर

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण ३८ नवे चेहरे घेण्यात आले असून आज हे सारे मंत्री पदभार स्वीकारणार आहेत. मोदींच्या अध्यक्षतेखाली या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होणार आहे. मात्र काल झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारावर आता महाविकास आघाडी सरकारने टीका केली आहे.

मंत्री मंडळाच्या विस्तारावर भाजपच्या जेष्ठ तसेच जुन्या चेहऱ्यांना डावलून इतर पक्षातून आलेल्या चेहऱ्यांना साधी दिल्यामुळे मोदी सरकारवर विरोधकांनीतिकेची झोड उतावळी आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुद्धा मंत्री मंडळाच्या विस्तारावर मोदी सरकारला टोला लगावला आहे.

त्या म्हणाल्या की, मंत्रिमंडळाचा विस्तार पाहता राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची नावे आणि नव्याने मंत्रीपदी विराजमान होणाऱ्यांची नाव वाचून असं वाटतंय इथून पुढे आयारामांना पक्ष सदस्य होण्यापूर्वी मंत्रीपदाची शपथ दिली जाईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

मोदी मंत्रीमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीपद देण्यात आल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्ही बघालच, अशी टीका शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राणे यांच्यावर केली आहे.

Team Global News Marathi: