सरकारकडून बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम सुरु, नारायण राणे यांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांमधून गायब झाले होते. मंगळवारी राठोड संपूर्ण परिवारासह मोहटादेवीच्या दर्शनासाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्यावर विरोधकांनी लावलेले आरोप नाकारत सत्य बाहेर येईल असं बलून दाखवलं होत. याच मुद्द्यावरून आता भाजपा नेते नारायण राणे यांनी राठोड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

भाजपा खासदार नारायण राणे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, हे सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. सत्ताधारी पक्ष आपली माणसं सांभण्याचं काम करत आहेत. आधी एकानं केलं, आता शिवसेना करत असल्याचं सांगत नारायण राणे यांनी सेनेसोबत राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं जाहीर नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? असा सवाल उपस्थित करत राठोड यांना टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: