ईडीकडून फक्त नाहक त्रास देण्याचे काम, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्रावर डागली तोफ !

 

पुणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थाप झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर अन आमदार, खासदारांवर ईडीच्या कारवाया झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीर अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रावर घणाघाती टीका केली होती. ‘ईडी’कडून नाहक त्रास देण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे. याआधी ईडीच्या कारवाया तुम्ही कधी पाहिल्या होत्या का? असा सवाल उपस्थित करत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

खासदार भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीकडून धाड टाकण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शरद पवार यांनी भावना गवळी यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचं म्हटलं. ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करुन केंद्र सरकार संपूर्ण देशभर व राज्यात अनावश्यक त्रास देण्याचं काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम असल्याचंही ते म्हणाले.

रिझर्व्ह बँकेचं नागरी सहकारी बँकांबाबतचं नवं धोरण पाहिलं असता देशातून नागरी सहकारी बँका बंद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा इरादा दिसतोय, असं म्हणत शरद पवार यांनी रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. विशिष्ट लोकांच्या हाती सूत्रं देऊन सहकार क्षेत्र संपविण्याचा घाट केंद्राकडून सुरू असल्याचाही घणाघात त्यांनी केला आहे.

Team Global News Marathi: