दिल्लीवरून या सरकारला रोज त्रास दिला जात आहे , शरद पवारांच मोठं विधान

 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवर काल आणि आज आयकर विभागाने धाडी मारून चौकशी सुरु केली. तसेच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर सुद्धा काल रात्री आयकर विभागाने धड मारली होती यावर आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. दिल्लीवरून महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधान केलं आहे.

ते आज सोलापुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवाय, आयकर विभागाच्या छापेमारीवरून देखील शरद पवारांनी यावेळी टीका केली. मला दिल्लीमध्ये एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने सांगितलं की, तुमचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. पण त्या दिवशी तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केला, ते काही रूजलं नाही आणि म्हणून तुमच्याकडे पाहुणाचार झाला.

पुढे ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये एखाद्या प्रश्नावर मत मांडायचा अधिकार आहे की नाही? आणि लोकशाहीत मत माडलं म्हणून तुम्ही घरांवर अशा पद्धतीने आणि ते देखील कुणाच्या बाया-बापड्याच्या, मुलींच्या ज्यांचा संबंध नाही. त्यांच्या घरावर तुम्ही छापे मारणार असाल, तर ठीक आहे तुम्ही मारा.. त्याची चिंता नाही. पण, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जिजामातेचा महाराष्ट्र आहे. सावित्राबाईंचा महाराष्ट्र आहे. आहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे. इथे आमची भगिनी कधीही लाचार होणार नाही असं त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: