दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबीयांनी विकत घेतली कवडीमोल भावाने जमीन – देवेंद्र फडणवीस

 

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. मंगळवारी दुपारी 12 वाजता म्हणजेच ९ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता ते पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडणार असे त्यांनी दिवाळीपूर्वी जाहीर केले होते. या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

अखेर दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्ब फोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा नकाब उघड केला आहे. १९९३ बॉम्ब स्फोटातील जन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल अशी अंडरवर्ल्डच्या या गुंडांची नावे आहेत.

२००३ साली हा सौदा सुरु झाला होता, नंतर २००५ साली हा सौदा पूर्ण झाला. २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर मीटर जमीन सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीने दाऊदच्या गुंडांकडून खरेदी केली. खरेदीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांवर फराज मलिक या व्यक्तीची सही आहे. ही जमीन मूळ गोवावाला यांच्या मालकीची होती.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सलीम पटेल कोण आहे माहित नव्हतं का?, मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन खरेदी का केली?, २० लाखांत तीन एकर जमीन तुम्हाला कशी काय दिली?, या आरोपींवर टाडा होता, तर टाडाच्या आरोपीची सगळी प्रॉपर्टी सरकार जप्त करतं. मग टाडाच्या आरोपीची संपत्ती जप्त होऊ नये म्हणून तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

Team Global News Marathi: