देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी काही संबंध आहे हे उद्या सांगेन -नवाब मलिक

 

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपणानंतर आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषेद घेऊन फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते फडणवीसांनी माझे अंडर वर्ल्डशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. मी याबद्दल आता काही बोलणार नाही. पण देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत, हे मी उद्या सकाळी दहा वाजता सांगेन,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं

राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून जमीन विकत घेतली असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले होते. या आरोपाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी म्हटलं की, मी बॉम्बब्लास्टच्या कोणत्याही आरोपीकडून प्रॉपर्टी खरेदी केलेली नाहीये. त्या जमिनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

नवाब मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली, असं फडणवीस यांनी म्हटलं. १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी एलबीएस रोडवर जागा विकत घेतली आहे.

आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली असं देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे.

सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती. १ लाख २३ हजार स्क्वेअर फूटांची गोवावाला कंपाऊंड येथे एलबीएस मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. या जमिनीची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर आहे. ही कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार खरा झाला की केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता, याचा तपास होणे आवश्यक आहे, असं फडणवीस यांनी म्हटले होत.

Team Global News Marathi: