१ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, खबरदारी म्हणून अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

१ मार्च २०२१ रोजी विधान भवन, मुंबईत २०२१ अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब आदी यावेळी उपस्थित होते.

तसेच तात्पुरत्या दिनदर्शिकेवर अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभा आणि विधानपरिषदेच्या बैठकांची चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करुन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले.

कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. २७ व २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी तसेच, प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार व रविवारी विधान भवन, मुंबई येथे यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: