रश्मी शुक्ला पुण्यात बिल्डर लॉबीकडून खंडणी गोळा करायच्या, माजी खासदारांचा आरोप

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव फोन टॅपिंग प्रकरणात राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यात मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी लागलेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते.

त्यात आता रश्मी शुक्ला यांच्यावर खंडणी गोळा करत असल्याचा आरोप माजी खासदार हरोभाऊ राठोड यांनी लगावला आहे. २०१६ साली धुमाळ एटीएसमध्ये कार्यरत असताना त्यांना प्रॉपर्टी सेलमध्ये कार्यरत असल्याचे दाखवत रश्मी शुक्ला यांच्यासाठी खंडणी वसुलीचे काम केल्याचा आरोप राठोडांनी केला आहे. हे प्रकरण गंभीर स्वरुपाचे असतानाही धुमाळांवर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच हे प्रकरण त्यांनीच रफा-दफा केल्याचा आरोप राठोडांनी केला.

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांना निलंबित केल्याचे मीडियासमोर राठोड सांगितले होते. पण धनंजय धुमाळांवर माहितीच्या अधिकारात कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नसल्याचे उजेडात आले आहे. धुमाळ निवृत्त होण्यापूर्वीच त्यांना स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी धुमाळ यांचे निलंबन केल्याचे म्हटले होते.

नागपूरमध्ये रश्मी शुक्ला असताना पोलीस उपायुक्त होत्या. त्यांचे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यावेळी संबंध चांगले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्लांना नेहमी अभय देत असत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्तामुळे हे प्रकरण देखील दाबून टाकण्यात आले. त्यामुळे रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करायच्या हे यावरुन देखील सिद्ध होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Team Global News Marathi: