माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला पदाचा गैरवापर! झोटिंग समितीचा अहवाल !

 

मुंबई | भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ताब्यात घेतले होते तसेच एकनाथ खडसे यांचया सुद्धा तब्बल सहा तास चौकशी केली होती. न्या. झोटिंग समितीच्या अहवालात खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे.

एकनाथ खडसे यांनी भोसरी जमीन खरेदी प्रकरणात स्वतःच्या किंवा पत्नीच्या आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका न्या. झोटिंग समितीच्या अहवालात ठेवला आहे. यामध्ये राज्याचा कोटय़वधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा ईडीचा प्राथमिक अंदाज आहे. या अहवालामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱया न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ रोजी गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला होता. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी न्या. झोटिंग यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने ३० जून २०१७ रोजी सरकारला गोपनीय अहवाल सादर केला होता. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या स्वतःच्या किंवा पत्नी आणि जावयाच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला. तसेच एमआयडीसी जमिनी संदर्भात माहितीचा वापर करून खडसे यांनी गोपनीयतेचाही भंग केल्याचे अहवालात नमूद केले आहे.

Team Global News Marathi: