मतदार संघातील विकास कामांच्या मुद्द्यावरून माजी मंत्री बबनराव लोणीकर आक्रमक !

 

विधानसभा मतदारसंघातील विविध विभागातील विकास कामांचा आढावा घेताना माजी मंत्री बबनराव लोणीकर ांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेत खडे बोल सुनावले परतूर तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना जनतेची कामे करा नसता घरी जा असा निर्वाणीचा इशारा दिला यावेळी आमदार बोलताना

बबनराव लोणीकर म्हणाले की, ६५ मी मी पेक्षा अधिक कोरडी झाल्यास ही वृष्टी अतिवृष्टी समजली जाते अशाप्रकारची अतिवृष्टी मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये झाली असून या ठिकाणी हजारो हेक्‍टर शेतजमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहे तर परतूर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहे त्यामुळे शेतकरी कोलमडून गेला असून अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने बोटचेपी भूमिका न घेता तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम करावे असेही ते म्हणाले.

चालू आर्थिक वर्षामध्ये पोखरा योजनेमधील शेतकऱ्यांना किती लांब मिळाला व कोणत्या योजना राबविण्यात आल्या असा प्रश्न आमदार लोणीकर यांनी विचारल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांना लोणीकर यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तर देता आले नाही यावेळी लोणीकर यांनी आपल्या काळामध्ये पोखरा योजनेसाठी किती निधी दिला होता याची आठवण करून अधिकाऱ्यांना निरुत्तरित केले

परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर मंठा नेर शेवली भागातील रस्त्यांच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना साईड पंख्याच्या प्रश्नावरून विचारणा करताना धारेवर धरत कंत्राटदारांनी केलेल्या कामासंदर्भात विचारणा केली कुठलेही काम करून घेताना दर्जा तपासा ज्यांनी निकृष्ट काम केले आहे त्यांची बिले आता करू नका दंड आकारा अशा खडक सूचना यावेळी त्यांनी दिल्या

आष्टी शहरांमध्ये सुरू असलेले अंतर्गत भूमिगत गटार योजना व अंतर्गत रस्ते यांची कामे त्वरेने पूर्ण करा अशा सूचना देताना शहरातील शंभर मीटर अंथरण्यासाठी लागणारे पाईप तात्काळ बसवा अशा कडक शब्दात सूचना आमदार लोणीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Team Global News Marathi: