“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना सुनावले !

 

पश्चिम महाराष्ट्रसह कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर्ण येऊन अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुरी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि दोन्ही विरोधी पक्षनेते फडणवीस आणि दरेकर हे सुद्धा राणे यांच्यासोबत कोकणात दाखल झाले होते.
यावेळी नारायण राणे हे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

मात्र यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी गप्प केलं आहे. ‘थांब रे मध्ये बोलू नको’ असं राणे दरेकरांना बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा मात्र रंगली आहे.

नारायण राणे हे प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला आहे. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्यावेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी थांब रे तू मध्ये बोलू नको असं म्हणत दरेकरांना थांबवलं असं दिसत आहे.

Team Global News Marathi: