माजी मुख्यमंत्री अमरिंदर यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू, उघडपणे भाजपात येण्याचे आवाहन,

 

पंजाब | पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी मोठी राकीय उलथापालट झाल्याचे दिसून आले ओटे. त्यात पक्षनेतृत्वांच्या दबावाखाली अमरिंदर यांना मुख्यमंत्री पदही राजीनामा द्यावा लागला होता.त्यामुळे संतापलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी थेट काँग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यातच मुख्यमंत्रिपद सोडण्यास काँग्रेसने भाग पाडल्यामुळे संतापलेले कॅप्टन अमरिंदर सिंग तसेच त्यांच्या समर्थक यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

सर्व राष्ट्रवादी मंडळींनी आमच्याकडे यायला हवे, असे भाजप नेते बोलू लागले आहेत.भाजपचे सरचिटणीस व पंजाबचे पक्षप्रभारी दुष्यंत गौतम म्हणाले की, अमरिंदर सिंग वा त्यांच्या समर्थकांना पक्षात यायचे असेल, तर त्यांचे स्वागतच होईल. त्यांना कोणी विरोध करणार नाही. आम्ही पंजाब विधानसभेच्या सर्व ११७ जागा लढवणार असल्याने अनेक नेतेमंडळी भाजपमध्ये येत आहेत. पंजाब हे सीमेवरील राज्य आहे आणि तिथे स्थिर सरकार असायला हवे. त्यासाठी सर्व राष्ट्रवादी शक्तींनी एकत्र यायलाच हवे.

कॅप्टन सिंग यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांनी केले आहे. त्याकडे लक्ष वेधता गौतम म्हणाले की, त्यात काय चूक आहे. ते म्हणाले ते योग्यच आहे. पंजाबबाबत आज पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली. तिथे अकाली दल काँग्रेस, आम आदमी पार्टी व भाजप अशा चौरंगी लढती होतील, असे आज स्पष्ट झाले आहे.

Team Global News Marathi: