शिमला – मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांचे बुधवारी निधन झाले. शिमला येथील 70 वर्षीय अश्विनी कुमार आपल्या रहात घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. एसपी शिमला मोहित चावला यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार अश्विनी यांनी आत्महत्या केली आहे. मात्र, त्यांनी असे पाऊल उचलण्याचे कारण अद्यापसमजू शकलेले नाही. हिमाचलच्या सिरमौर येथे राहणारे अश्विनी कुमार ही 1973 बॅचचे आयपीएस अधिकारी होती. सीबीआयचे संचालक, हिमाचल प्रदेशचे डीजीपी याच्यासह अनेक पदांवर त्यांनी कामगिरी वाजवली आहे.
बुधवारी अश्विनी कुमार यांनी त्यांच्या शिमल्यामधल्या ब्रॉकहोर्स्ट या त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते काही काळापासून डिप्रेशनमध्ये होते.