बदनामीचा बलात्कार करणाऱ्यांना धडा शिकवा!, सालियन प्रकरणावरून सामनातून भाजपवर टीका

 

मुंबई | काही दिवसांपासून दिशा सालियन प्रकरणावरून भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतही त्यांनी हा दावा केला की दिशा सालियनवर बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

नितेश राणे यांनीही यासंदर्भातले काही ट्विट केले होते. तसंच चंद्रकांत पाटील यांनीही टीका केली होती. त्यावरून आता पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. राजकीय बदनामीचा बलात्कार करणाऱ्यांना धडा शिकवा असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली, नारायण राणेंचा पुन्हा आरोप

सामना अग्रलेखात म्हंटल आहे की, ‘खून आणि बलात्कार यावर भाजपचे लोक अलीकडे अधिकारवाणीने बोलताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला असून मृत महिलांची यथेच्छ बदनामी सुरू केली आहे. दिशा सालियन या तरूणीची आत्महत्या सगळ्यांनाच अस्वस्थ करून गेली.

दिशा सालियन तिच्या एका मित्रासोबत पार्टीत गेली होती. त्यानंतर तिने स्वतःला गॅलरीतून झोकून दिलं आणि आत्महत्या केली. दिशाच्या आत्महत्येचा संबंध सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी जोडण्याचाही प्रयत्न झाला. त्याबाबत अनेक कथा आणि उपकथानकांचा जन्म झाला. या सर्व प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि सीबीआयने केला. त्यातून सर्व आरोप आणि संसयांना उत्तरं मिळाली. दिशावर मृत्यूपूर्वी बलात्कार झाला असे त्यावेळीही राजकीय लोकांनी उठवले. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ते सांगत नाही.’

Team Global News Marathi: