करुणा शर्मा-मुंढेला अटक; आज न्यायालयात करणार हजर

करुणा शर्मा-मुंढेला अटक; आज न्यायालयात करणार हजर

परळी दि.5 : गेल्या काही दिवसांपासून सोशलमिडीयावर चर्चेत असलेल्या करुणा शर्मा यांनी घोषित केल्याप्रमाणे की, मी परळीत येवून पत्रकार परिषद घेणार त्याप्रमाणे रविवारी (दि.5) सकाळी 10 वाजता बीड मध्ये दाखल झाल्या. त्यानंतर परळीत 12 ची वेळ दिलेली असताना दुपारपर्यंत त्या पोहचल्या नव्हत्या. दुपारी दोन नंतर परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर तिथे मंदिर परिसरातील महिलांबरोबर बाचाबाची झाल्याने शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मा विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले असून सोमवारी अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती आहे.

रविवारी पोलीस प्रशासनाने संपूर्ण परळी शहरात व पत्रकार परिषद होणार असलेल्या वैद्यनाथ मंदिर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. विशेषतः महिला पोलीसांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. येथील शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुना शर्मा या वैद्यनाथ मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या असता विशाखा रविकांत घाडगे व गुड्डी छोटूमियाँ तांबोळी या महिलेबरोबर बाचाबाची झाली. यावेळी करुणा शर्मांनी दोघींना तुम्ही पैसे घेऊन इथे आला असल्याचे म्हणत लाथा बुक्यानी मारहाण केली व जीवे मारण्याच्या उद्देशाने गुड्डी तांबोळी या महिलेस चाकू मारला

यामध्ये महिला जखमी झाली आहे. उपचारासाठी आंबेजोगाई येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादिवरुन करुणा शर्मा व अरुण मोरे (मुंबई) यांच्यावर भादवि 142/ 2021 कलम 307, 323, 504, 506-34 नुसार अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपअधिक्षक सुनील जायभाये हे करत आहेत. दरम्यान करुणा शर्मा व अरुण मोरे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी (दि.6) आंबेजोगाई येथील न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: