रुपाली ठोंबरे पाठोपाठ मनसेला मोठा झटका, हा नेता करणार राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरनव्याने राज्यात दौरा करत आहेत. त्याचवेळी त्यांना एक एक धक्का बसत आहे. पुणे दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. आता विदर्भातही मनसेला गळती लागण्याची चिन्हे आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्षच आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे विदर्भात मनसेला मोठा झटका मानला जात आहे.

विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. अतुल वांदिले हा विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा आगे. उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात ते घेणार प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माणसे पक्षाला लागलेली घर-घर येणाऱ्या काळात पक्षाचे मोठे नुकसान करण्याचे चिन्ह दिसत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादीत अतुल वांदिले हे ४० पदाधिकाऱ्यासोबत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील काही सदस्य ,सरपंच आणि पदाधिकारी अतुल वांदिले यांच्या सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे.

Team Global News Marathi: