करीनाच्या नव्या बळासाठी नेटकऱ्यांनी सुचविले नाव ‘मुबारक हो औरंगजेब आया है’

अभिनेत्री करीन कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सैफली खान आणि करीन कपूर हिच्या घरी नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. करिना कपूर हिला शनिवारी रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काल २१ फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या नावावरुन करीना आणि सैफ चांगलेच ट्रोल झाले होते. आता सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तैमूरच्या भावाचे नाव काय. यावरून नेटकऱ्यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.

तैमूरच्या भावाच्या नावावरून अनेकांनी कमेंट केल्या होत्या. काहींनी तर ‘मुबारक हो औरंगजेब आया है’ असं म्हंटले आहे. तैमूरचा छोटा भाऊ औरंगजेब आला अशा कमेंट करत निशाणा साधला आहे. तर काहींनी महमंद घोरी, अहमद शहा अब्दाली आणि खिलजी अशी नावं सूचवत सैफ आणि करीनाला पुन्हा ट्रोल केले आहे.

Team Global News Marathi: