नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधीपक्षाची चाकरी करायची, चाकणकर यांची परमबीर सिंह यांच्यावर घणाघाती टीका

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे मार्फत १०० कोटी रुप्याच्या हप्ता वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर गृहमंत्र्यांवर सर्व बाजूंनी टीका होताना दिसत होती. त्यात याच मुद्द्यावरून राष्ट्र्वादीने परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला होता. त्यातच आता चाकणकर यांनी ट्विट करून परमबीर सिंह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे

‘नोकरीसाठी महाराष्ट्रात यायचं, राज्याची नोकरी करतानाच विरोधीपक्षाची चाकरी करायची, अमाप संपत्ती कमवायची आणि शेवट जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं.’ असे नाव न घेता रुपाली चाकणकर यांनी परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच पुढे बोलताना एक पोस्टर शेअर करत त्या पोस्टरच्या माद्यमातून म्हणतात की, मुंबईत चार कोटी रूपयांचे दोन फ्लाॅट तर हरियाणात आपल्या गावी त्यांनी चार कोटी रुपयांचे घर घेतल्याचा आरोप परमबीर सिंग यांच्यावर केला आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती देखील आहे. अंधेरीतल्या वसुंधरा सोसायटीत ४८.७५ लाख रूपयांचा फ्लाॅट घेतला आहे. तर २०१९ मध्ये त्यांनी १४ लाख रुपयांची जमिन खरेदी केली आहे, हरियाणात त्यांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या नावे संयुक्तपणे चार कोटी रूपयांचे घर आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

 

 

 

Team Global News Marathi: