भाजपचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविद यांना दलित असल्यामुळे कमी किंमत देतात, काँग्रेस नेत्याचा आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर जातीवादाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात भाजपाकडून निर्माण करण्यात आलेल्या जातिव्यवस्थेवर काँग्रेसकडून बोट ठेवण्यात आले आहे.

भाजपामध्ये दलित नेत्यांना काडीची किंमत नाही. अगदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडून अशीच वागणूक दिली जाते, असा आरोप काँग्रेसचे नेते उदित राज यांनी केला होता. एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान उदित राज यांनी हे विधान केले आहे.

प्रकरण असे की, भाजपाचे प्रवक्ते प्रेम शुक्ला, ‘माझी भाजपमध्ये राहण्याची लायकी नव्हती’ असे बोलून गेले. यावर उदित राज यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा उदित राज यांनी आक्रमक होऊन भाजपावर जोरदार टीका कार्याला सुरवात केली होती. तेव्हा भाजपाच्या प्रवक्त्याने देशाचे राष्ट्रपती दलित आहेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

शुक्ला यांच्या या विधानावर उदित राज म्हणाले कि, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपाचे नेते किंमत देत नाहीत. रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे राहतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींनी हात जोडून नमस्कार केला तर मोदी त्यांचं अभिवादनही स्वीकारत नाहीत, असा आरोप उदित राज यांनी यावेळी केला.

Team Global News Marathi: