मराठा समाजातील मुलींसाठी ५० खटांच्या वसतीगृहाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 

ठाणे | राज्यातील मराठा विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात ठाणे महानगर पालिकेतर्फे तयार करण्यात आलेले वसतिगृह आता मुलींसाठी देण्यात येणार आहे. तर भविष्यात पालिकेच्या मालकीचे असणाऱ्या घोडबंदर रोड वर १०० रुमचे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी दिल जाईल असं राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

ठाण्यातील माजीवडा येथील डॉ पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतिगृह या ५० बेडच्या मुलींच्या वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी मंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सदरचा वसतिगृहाची जागा ही सुरक्षित ठिकाणी असल्याने हे वसतिगृह मुलींसाठी देण्यात आले असून घोडबंदर रोड वरील १०० बेडचे मुलांसाठी वसतिगृह देखील लवकरच उपलब्ध होईल असं शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केलं.

तसेच या वसतिगृहात मराठा विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा मिळतील याची संबंधित प्रशासनाने काळजी घेतली असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले. पालिकेच्यावतीने हे वसतिगृह बांधून जिल्हाधिकारी कार्यलयाला हस्तांतरित करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: