पुरबाधितांच्या मदतीसाठी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी आले धावून

 

किल्ले प्रतापगड आणि आजूबाजूच्या ३५ गावातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व शिवसेना आमदार अजय चौधरी हे धावुन आले आहेत. त्यांनी पुरग्रस्तांसाठी एका कुटुंबाला एक महीना पुरेल इतके अन्न, धान्य, दुध, भाजीपाला, कपडे, औषधे अशा विविध प्रकारची सर्व मदत भरलेले ९ ट्रक व १ रूग्णवाहीका सोबत आणली आहे. तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या मदतीचे वाटप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

पुरग्रस्त भागातील शेतकरी व ग्रामस्थांशी मुंबईच्या महापौर किशारी पेडणेकर यांनी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजावुन घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधताना महापौर पेडणेकर म्हणाल्या की या अतिवृष्टीमुळे तुमच्यावर आभाळच कोसळले आहे. तुमचे संसार उघडयावर पडले आहेत. जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई कोणत्याही स्थितीत होवु शकत नाही पंरतु शिवसेनेच्या वतीने आम्ही छोटीशी मदत आणली आहे, ही मदत तुम्ही गोड मानुन घ्या.

तसेच गरजुंच्या मदतीला धावुन जाण्याचे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले संस्कार आहेत. तुमचे संसार उभे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते आम्ही नक्की पुर्ण करणार याची तुम्ही खात्री बाळगा. तुम्हाला उभे केल्या शिवाय आ. अजय चौधरी हे स्वस्थ बसणार नाहीत. या अडचणी मध्ये तुम्ही एकटे नाही संपुर्ण शिवसेना तुमच्या सोबत आहे अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुरग्रस्त ग्रामस्थांना धीर दिला.

Team Global News Marathi: