कोरोना लसीसाठी ५० रुपये का ?, मग अर्थसंकल्पात ३५ हजार कोटीची तरतूद कशातही केली ?- पृथ्वीराज चव्हाण

दिल्ली : केंद्राने दुसऱ्या टप्यातील लसीकरणाला सोमवार पासून सुरवात केली आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक लस घेणाऱ्या व्यक्तीकडून २५० रुपये असा जादा चार्ज आकारण्यात येत आहेत यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्राने लसीकरण मोहिमेसाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढी मोठी तरतूद केलेली असताना सामान्य नागरिकांकडून लसीकरणासाठी २५० रुपये आकारण्याची गरज काय? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला केला आहे.

देशभरात १ मार्चपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ किंवा ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रामध्ये कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. यामध्ये केंद्र सरकारने लसीची किंमत २५० रुपये प्रति डोस इतकी ठेवली आहे. मात्र या लसीकरणाच्या किमतीवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकरला टोला लागलेला आहे.

Team Global News Marathi: