ऊर्जामंत्र्यांचे अपयश झाकण्यासाठी चीनच्या डोक्यावर खापर- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मुंबईत झालेल्या बत्तीगुल प्रकरणात चीनच्या सायबर हल्याचा हात असल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सने काही दिवसांपूर्वी केला होता. याचाच आधार घेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची विनंती राज्यासह गृहमंत्री देशमुख यांना केली होती. यावर आता राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतां यांना टोला लगावला आहे.

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवत आहे. तसेच जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

बावनकुळे म्हणाले की, “१२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत चीनच्या सायबर हल्ल्याचे कारण दिले आणि जनतेची दिशाभूल करणे सुरू केले.

एका वृत्ताच्या आधारावर एखादा आयपीएस अधिकारी अहवाल तयार करतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप असल्याचं नमूद करतात. अशा महत्त्वाच्या अहवालाची कोणतीही खातरजमा न करता राज्याचे गृहमंत्री थेट पत्रकार परिषद घेऊन आपली जबाबदारी झटकताहेत हे अत्यंत गंभीर आहे. असे त्यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: