नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण…..!

नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण…..!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार याला शरद पवारांनी फटकारल्यानंतर आता पार्थ पवारांच्या बाजूने नितेश राणे यांनी उभार राहून ट्विट केले आहे. “पार्थ… लंबी रेस का घोडा है” असे ट्वीट नितेश राणेंनी केले आहे.

त्यामुळे आता विरोधकांनी शरद पवारांच्या बोलण्यावर सुद्धा राजकारण सुरु केले आहे. “आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !!” असे ट्विट राणे यांनी केले आहे.

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेऊन सिने अभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीचे पत्र गृहमंत्र्यांना दिले होते. यावर पत्रकार समूहाने शरद पवारांना प्रश्न विचारता ““माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ” असे वक्तव्य केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: